
– मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील एका ३३ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून स्वतःची जीवन यात्रा संपविल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी सकाळी घडली.या दुःखद घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्रविण शायनीक काळे (३३) रा.हिवरी असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे.प्रविन यांचे नावे अर्जुनी शिवारात ४ एकर शेती असल्याची माहिती आहे.
दरम्यान १३ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० वाजे दरम्यान प्रवीण यांनी स्वतःचे शेतात विषारी औषध प्राशन केले. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच कुटुंबीयांनी प्रवीण यांना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात हलवीत असता वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
मृत प्रवीण यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असुन एका युवा शेतकऱ्याने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.