
•शस्त्राच्या धाकावरील लूट प्रकरण
•शहरात विविध चर्चांना उधाण
•लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील नवरगाव येथील डॉक्टर हाजरा यांना शस्त्राच्या धाकावर “नाचवत” अज्ञात आरोपींनी चार लाख रुपयांची लूट केली.१३ मार्च रोजी सायंकाळी घडलेल्या या घटनेने शहरात चांगलीच खळबळ माजली असून विविध चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान १३ मार्च रोजीच्या रात्री नवरगाव येथून मारेगाव येथे आपल्या घरी परत येत असताना राज्य महामार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ अज्ञात लूटारूंनी त्यांची स्कुटी अडवून चाकू व बंदुकीच्या धाकावर कारमध्ये बसवत अंगठी,चेनसह रोख असा ऐकुन ४ लाख रूपये कीमतीचा ऐवज लुटत डॉक्टर ला भर रस्त्यात सोडुन पोबारा केला होता.
दरम्यान या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आरोपींच्या शोधात मारेगाव पोलीस पथकाने चहुबाजूंचा परिसर “पालथा” घातला असून या गंभीर प्रकरणाचा कसुन तपास सुरू आहे.”त्या” चार अज्ञात चोरट्यांना शोधण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले असतानाच शहरात मात्र विविध चर्चांना उधाण आले असून “पडद्या मागील नेमकी बिग स्टोरी काय…?” या प्रश्नाचे उत्तर “त्या”चौघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या नंतरच स्पष्ट होणार आहे.