
– स्पर्धायुगात डोनेशनचे दर अवाक्याबाहेर
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
विज्ञान व संगणकीय युगात मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरु असुन सर्वसामान्य कुटुंबातील मुलामुलींचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतरही खाजगी शिक्षण क्षेत्रात डोनेशनच्या अवाढव्य मागणीमुळे, सर्वसामान्य कुटुंब डोनेशनचा भार पेलु शकत नसल्याने मुलामुलींचे साधे शिक्षक होण्याचे स्वप्न सुध्दा भंगणार असल्याचे विदारक वास्तव आहे .
असामान्य संस्कृती म्हणुन भारतीय संस्कृतीकडे आदराने पाहील्या जाते.प्राचिन काळापासुन गुरुला अनन्य साधारण महत्व प्राप्त आहे.प्राचिन काळी एकाच गुरुकुलात गरीब श्रीमंतांची मुले गरीब श्रीमंतीचा भेदभाव न होता शिक्षण घ्यायची.एवढेच नव्हेतर या शिक्षणातुन, संस्काराचे सुध्दा धडे दिले जायचे, म्हणुनच की काय सहपाठी मित्राला गुरुबंधु हे संबोधन सर्वश्रुत आहे.
परंतु बदलत्या काळाबरोबर गुरुबद्दलच्या व्याख्या बदलत गेल्या.गुरु चे गुरुजी व शिक्षणाचे स्वरुप बदलुन पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा घेवुन आता “सर”झाले. आज वैज्ञानिक व संगणकीय काळात स्पर्धा खुप झपाट्याने वाढीस लागली.
तीस चाळीस वर्षापुर्वि शिक्षक होणे फार काही कठीण नव्हते.कारण दहावी झाल्यानंतर शिक्षक होता येत होते.सेवा जेष्ठतेनंतर हेच शिक्षक पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पुर्ण करायचे मात्र मागील दहा पंधरा वर्षापुर्विपासुन “डोनेशन “हे नाव पुढे आले.
पन्नास हजार ते एक लाखापर्यंत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी मोजावे लागत होते.आता तर सहावा, सातवा वेतन आयोग आलाय,आणि खाजगी शाळा संस्थापकांचे कालमानपरत्वे डोनेशनमुळे चांगलेच फावले.
परिणामी कसाबसा संसाराचा रथ हाकत असतांना सर्वसामान्य कुटुंबातील मुली मुले शिकुन नौकरीला लागेल ही भोळी आशा, या खाजगी क्षेत्रातील वाढत्या डोनेशनमुळे शिक्षण व नौकरी मिळणे दुरापास्त झाले आहे.