
– ३०५० रुपयाचा मुद्देमाल जप्त
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील टाकरखेडा शिवारात अवैधरीत्या कोंबड बाजार सुरू असल्याची माहिती १ डिसेंबर रोजी ठाणेदार जनार्दन खंडेराव यांना मिळाली.परिणामी मारेगाव पोलिसांनी टाकरखेडा शेतशिवारात धाड टाकत तीन हजार पन्नास रुपयांच्या मुद्देमालासह दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
ता. १ डिसेंबर रोजी तालुक्यातील टाकरखेडा शेतशिवारात अवैधरीत्या कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळला जात असल्याची माहिती मारेगाव पोलीस स्टेशन ठाणेदार जनार्दन खंडेराव यांना मिळाली. सदर बाबीची शहानिशा करून मालेगाव पोलिसांनी टाकरखेडा शेत शिवरात कोंबड बाजारावर धाड टाकली असता तेथून तीन हजार पन्नास रुपयांच्या मुद्देमालासह पळून जात असलेल्या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली.
अंकुश चिंतामण कनाके (४८) रा. मारेगाव व अशोक कोवे रा.मारेगाव अशी मारेगाव पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. संशयतांची अंग झडती घेतली असता पोलिसांना अनुक्रमे १०५० रुपये नगदी व कोंबड्यांची किंमत अंदाजे दोन हजार रुपये असा मुद्देमाल आढळून आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ, अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनात मारेगाव ठाणेदार जनार्दन खंडेराव यांचे सह पोहेका आनंद अलचेवार, पोहेका जुनेद, नापोका अफजल पठाण,नापोका रजनीकांत पाटील यांनी पार पडली.