
– राज्य महामार्गावरील करणवाडी येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील करणवाडी फाट्यानजीक असलेल्या दुभाजकाला भरधाव दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजे दरम्यान घडली.
विलास विठ्ठल बुरान (३०) रा. घोडदरा असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार युवकाचे नाव आहे.
दरम्यान १० नोव्हेंबर रोजी विलास काही कामानिमित्त मारेगाव येथे आले होते.सायंकाळी ४:३० वाजेदरम्यान घोडदरा येथील स्वगृही परतीच्या प्रवासात असताना राज्य महामार्गावरील करणवाडी फाट्यानजीक असलेल्या दुभाजकाला त्यांची भरधाव दुचाकी धडकली.यात ते गंभीर जखमी झाले.
रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी जखमी विलास यांना प्राथमिक उपचाराकरिता मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथून पुढील उपचारार्थ वणी येथील सुगम रुग्णालयात हलविल्याची माहिती आहे.