
– श्री.गुरुदेव सेवा मंडळ बोटोनी व ज्येष्ठ समाजसेवक पुंडलिक साठे यांचा पुढाकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील बोटोनी येथील श्री.गुरुदेव सेवा मंडळ व जेष्ठ समाजसेवक पुंडलिक साठे यांच्या संयुक्त विध्यमाने वंदनीय तुकडोजी महाराज यांचे पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन ऊद्या ता.१९ नोव्हेंबर रात्री ७ वाजता करण्यात आले आहे.तसेच याप्रसंगी येथील जि.प.शाळेतील प्रांगणात सप्तखंजेरी वादक,प्रबोधनकार श्री.सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा बोटोनी येथे आयोजित करण्यात आला आहे.तसेच ज्येष्ठ समाजसेवक पुंडलिक साठे यांचे नातू विराट पंकज साठे यांच्या नवव्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर सप्त खंजेरी वादक श्री. सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाची मेजवानी येथील जिल्हा परिषद प्रांगणात रंगणार आहे.
सदर कार्यक्रमास उद्घाटक म्हणून न्यायाधीश निलेश वासाडे, प्रमुख अतिथी उपविभागीय अधिकारी वणी नितीन इंगळे, प्रमुख पाहुणे मारेगाव तहसीलदार निलावाड, बिडीओ मडावी, मारेगाव ठाणेदार जनार्दन खंडेराव, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मारेगाव डॉ .एस.इंगळे, बोटोनी सरपंचा सुनीता जुमनाके, उपसरपंच प्रवीण वनकर तसेच बोटोनी येथील शेकडो ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.
श्री.सत्यपाल महाराजांच्या या कीर्तनरुपी मेजवानीस शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री.गुरुदेव सेवा मंडळ बोटोनी व ज्येष्ठ समाजसेवक पुंडलिक साठे यांनी केले आहे.