
– अविनाश लांबटसह अनेकांची ‘एन्ट्री’
– आमदारांच्या विकसनशील कार्यपद्धतीचा परिपाक
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून अनेक पक्षांनी आपली गट बांधणी सुरू केली आहे.यात भाजपानेही आपली कंबर कसली आहे.परिणामी रविवारी ३० जुलै रोजी स्थानिक विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात भाजपात ‘मेगा भरती’ झाली.यावेळी अ.भा.स.परिषदेचे तालुकाध्यक्ष अविनाश लांबट यांचेसह अनेकांनी थाटात पक्षप्रवेश केला.यास आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या विकसनशील कार्यपद्धतीचा परिपाक म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
सद्यस्थितीत मारेगाव तालुक्याचे राजकारण परमोच्च शिखरावर आहे.परिणामी यात कधी कोणता उलटपफेर होईल याची तिळमात्रही शाश्वती राहिलेली नाही.तुर्तास राजकारणात सुरू असलेल्या या ‘त्सुनामीत’ सर्वच राजकीय पक्षांनी आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून आपली गट बांधणी सुरू केली आहे.यात भाजपाही तालुक्यात कात टाकताना दिसतेय.
रविवारी ३० जुलै रोजी स्थानिक विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे उपस्थितीत अनेकांनी पक्षप्रवेश करून याचा प्रत्यय दिला.
यावेळी अविनाश देविदास लांबट (उपसरपंच ग्रा. पं. सिंदी तथा अध्यक्ष सरपंच संघटना, मारेगावं, संचालक कृ. उ. बा. समिती) यांचेसह डोमा भादीकर (सेवानिवृत्त पोलिस अधिकारी) ,दिशीत प्रभाकर मोरे (युवा सामाजिक कार्यकर्ते),सुहास वरारकर (सामाजिक कार्यकर्ते) ,प्रसाद राजापुरे, विघ्नेश दुर्गे,आदित्य डाखोळे,आयुष आसुरकर,श्रीकांत गौरकर (सरपंच कोधुर्ना), चंद्रकांत धोबे (माजी उपसरपंच ग्रापं.गौरळा),मनोहररावजी गेडाम (सोसायटी सदस्य),प्रदिप डाहुले (माजी सरपंच ग्रा. पं. सिंधी), प्रविण बोथले (सामाजिक कार्यकर्ता),दिलीप आत्राम (उपसरपंच ग्रा. पं. सिंधी), दिनेश गेडाम (ग्रा. पं. सदस्य सिंधी), नरेश चौधरी (ग्रा. पं. सदस्य दारोडा), गणेश उत्तम खुसपुटे (सामाजिक कार्यकर्ता),प्रशांत बालाजी चौधरी (कुंभा),आशिष खंडाळकर (रामेश्वर) ,गोपाल धाकने (कोथुर्डा), मुरलीधर बलकी (महागावं), सुमित जुनघरे (देवाळा),गणेश पांढरे (कोथुर्डा),सचिन गौरकर (मांगरूळ) ,संतु तुरणकर (महागावं), अनिल नथ्थुजी पारखी (गौउवुरांडा),विजय वानखेडे (गौउवुरांडा), विनोद चहानकर (सोसायटी सदस्य) आदींनी थाटात भाजपात पक्ष प्रवेश केला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे,भाजपा जिल्हा सचिव शंकर लालसरे, किसान आघाडी उपाध्यक्ष मंगेश देशपांडे, जिल्हा सचिव युवा मोर्चा प्रसाद ढवस,तालुका महामंत्री प्रशांत नांदे,पवन ढवस, युवा मोर्चा शहराध्यक्ष अनुप महाकुलकर, युवा मोर्चा महामंत्री रवी टोंगे,सुधाकर बोबडे,शशिकांत आंबटकर, वैभव पवार,राहुल राठोड,नगरसेविका सौ.भादीकर, उपाध्यक्ष नगरपंचायत मारेगाव सौ.वर्षा माहाकुलकर व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.