
– मारेगाव शहरातील घटना
– दुचाकीस्वार घाटंजी तालुक्यातील
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
येथील कला वाणिज्य महाविद्यालया नजिक भरधाव दुचाकीस कुत्रा आडवा आल्याने दुचाकीस्वाराचे दुचाकी वरील नियंत्रण सुटून दुचाकी दुभाजकाला धडकल्याने दुचाकीस्वार दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना २ जुलै रोजी रात्री ८:४५ वाजे दरम्यान घडली.
निखिल गिनगोले,गजानन क्षिरसागर,आदित्य भोंग तिघेही रा.घाटी (ता.घाटंजी) अशी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
दरम्यान रविवारी रात्री तिघेही आपल्या दुचाकीने (क्र.एम.एच.२९ बी.के.०२०३) वणी येथुन घाटी ता.घाटंजी येथील त्यांचे स्वगृही जात असता येथील कला वाणिज्य महाविद्यालयासमोर भरधाव दुचाकीस कुत्रा आडवा आल्याने चालकाचे दुचाकी वरील नियंत्रण सुटून दुचाकी दुभाजकाला धडकली.यात दुचाकीवरील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले.तर एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच जनहित कल्याण संघटनेचे रुग्णवाहिकेने जनहितच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी जखमींना प्राथमिक उपचाराकरिता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून यातील दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्याने जखमींना पुढील उपचारारार्थ इतरत्र हलविण्याची प्रक्रिया सुरू होती.