
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची भूमिका, पक्षाची राजकीय रणनीती, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी, मारेगाव तालूका भारतीय जनता पक्षाच्या वतीने, मारेगाव येथे उद्या ता.१२ ऑगस्ट रोजी स्थानिक शेतकरी सुविधा केंद्रात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मारेगाव तालुका भारतीय जनता पक्षाचे अधिवेशन होणार असुन या अधिवेशनासाठी वणी विधान सभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी जिल्हाध्यक्ष नितीन भूतडा यांचेसह भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
सध्या वणी विधान सभा क्षेत्रात सर्वच राजकीय पक्ष आगामी विधान सभा निवडणुकीसाठी सक्रीय झाले आहेत. मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत मताधिक्य घेत आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार सलग दोनदा निवडून आले असुन होणाऱ्या निवडणुकीत “हॅटट्रिक ” साधण्याच्या तयारीत असल्याने, भारतीय जनता पक्षाची आगामी काळातील भुमिका, व राजकीय रणनिती आखून पक्ष संघटन सुदृढ असावे व त्यावर भर असावा यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वणी विधान सभा क्षेत्रातील मारेगाव येथे स्थानिक शेतकरी सुविधा केंद्रात सकाळी १० ते ३ या कालावधीत उद्या ता. १२ ऑगस्ट रोजी वणी विधान सभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी जिल्हाध्यक्ष नितीन भूतडा यांचेसह भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आजी, माजी खासदार, आमदार, सर्व आजी माजी लोकप्रतिनिधि, राष्ट्रीय व प्रदेश कार्यकारिणी सदस्य, जिल्हा पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य, सर्व मंडळ अध्यक्ष, तालुका आणि शहर कार्यकारिणी सदस्य, सर्व आघाडी, प्रकोष्ठ व सेल चे अध्यक्ष व कार्यकारिणी, बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, सहकारी संस्थेचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत अधिवेशन आयोजित करण्यात आले असुन अधिवेशनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मारेगाव तालूका भाजप अध्यक्ष अविनाश लांबट यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऐतिहासिक यशाबद्दल अभिनंदन ठराव
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पूर्ण बहुमत मिळवून देत सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचे ऐतिहासिक यश मिळवित सहा दशकांनंतर देशात एका नेत्याला सलग तीनवेळा पंतप्रधान होण्याचा मान मोदीजींच्या रुपाने मिळाला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतकाळात भारत विकसित देश व्हावा, अशी आकांक्षा बाळगणाऱ्या कोट्यवधी भारतीयांच्या आशा या यशामुळे उंचावल्या आहेत. मोदीजींच्या नेतृत्वात गेली दहा वर्षे देशात सर्व क्षेत्रात विकास करून परिवर्तन झाले. आता आगामी पाच वर्षातही सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विकास कार्यात नवी शिखरे गाठली जातील, असा दृढविश्वास निर्माण झाल्याने अभिनंदन ठराव या अधिवेशनात घेण्यात येणार आहे.