
– आठवडी बाजारातून चक्क ४ मोबाईल लंपास
– शहरात खमंग चर्चा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
शहरात मोबाईल चोरट्यांनी डोके वर काढले असून मंगळवारी आठवडी बाजारातून चक्क ४ मोबाईल चोरी गेल्याची खमंग चर्चा शहरात सर्वदूर रंगली आहे.मात्र चोरी गेलेल्या मोबाईल धारकांपैकी एकानेही याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल केली नाही हे विशेष.
तालुक्यातील एकमेव मोठी बाजारपेठ म्हणून मारेगावची ख्याती आहे.दर मंगळवारी भरणारा शहरातील आठवडी बाजार म्हणजेच तालुक्यातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नागरिकांची प्रचंड गर्दी. याच गर्दीतून मोठ्या फुशारकीने एकाच दिवशी तब्बल ४ मोबाईल चोरी गेल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
मंगळवारी आठवडी बाजारातून एकाच दिवशी तब्बल ४ मोबाईल चोरी गेल्याच्या चर्चेने शहरात मोबाईल चोरटे सक्रिय असल्याची बाब अधोरेखित केली आहे.
मोबाईल चोरीची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल करावयाची असताना पोलिसांकडून शेकडो प्रश्नांचा भडीमार केला जात असल्याने कोणत्याही मोबाईल धारकाने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली नसल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे.