
ईद आणि अक्षयतृतीया निमीत्त सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा…!
शुभेच्छुक-
सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन वणी व एकविरा पतसंस्था मारेगाव,
अध्यक्षा- सौ. किरणं ताई देरकर आणि स्त्री शक्ती सन्मान फाउंडेशन च्या सर्व सदस्य महिला.
कायर,मारेगांव,मुकुटबन,पाटण येथे सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन तर्फे रमजान या पवित्र महीन्यात मुस्लिम समाज महीला सखींसोबत ईफ्तार पार्टीचे (स्नेहभोजन)आयोजन करण्यात आले होते.
‘स्त्री शक्ती फाउंडेशन’ व ‘एकविरा पतसंस्था मारेगाव’ यांचे पुढाकाराने १७,१९,२०,२१ एप्रिल रोजी कायर,मारेगांव,मुकुटबन,पाटण शहरात सामाजिक सलोखा राखत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक सलोखा राखत एकतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमास शहरातील मुस्लिम भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. मोठ्या आनंदात व उत्साहात स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सौ. किरण देरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थित भगिनींशी यथेच्छ संवाद साधला.
दरम्यान मारेगाव येथील एका सहा वर्षीय चिमुकलीने रोजा ठेवल्याने त्या चिमुकलीचा सत्कार करण्यात आला होता हे विशेष.
यावेळी सौ.किरण देरकर सह शहरातील शेकडो महिला व मुस्लिम भगिनी उपस्थित होत्या.