
– अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाईची मागणी
– मनसे तालुका शाखा मारेगाव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यात सुरू असलेली बेंबळा प्रकल्प कालव्याची कामे निकृष्ट दर्जाची होत असून यात सर्रास माती मिश्रित रेतीचा वापर केला जात आहे.परिणामी पावसाळ्यात कालवा फुटून शेतीचे संभाव्य नुकसान टाळता येत नसल्याने बेंबळा प्रकल्प अधिकारी व कंत्राटदार यांचेवर फौजदारी गुन्हे कायम करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांचे नेतृत्वात तहसीलदारांमार्फत २० जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेंबळ प्रकल्प कालव्याची कामे सुरू आहे.परंतु या कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असून सदर कामांत माती मिश्रित रेतीचा सर्रास वापर केला जात आहे. यात येऊ घातलेल्या पावसाळ्यात कालवे फुटून पाणी शेतात शिरल्यास शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार असा कयास आहे.
मागील वर्षी झालेल्या नुकसानीची पुनरावृत्ती यावर्षी होऊ नये म्हणून बेंबळा प्रकल्प कालव्याच्या कामाचा दर्जा तपासण्याची नितांत गरज असून जी कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत तेथील अधिकारी व कंत्राटदार यांचे वर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे यासंबंधीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी,यवतमाळ यांना तहसीलदारांमार्फत २० जून रोजी देण्यात आले.
यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांचेसह शशिकांत बोढे,भास्कर गुहे, किशोर मानकर, विलास गानफाडे, जमीर सय्यद, चांद बहादे,सुरज नागोसे नगरसेविका अंजुमन नबी शेख, प्रतिभा तातेड, बेबी आत्राम आदी उपस्थित होते.