
– घरावरील छप्पर उडाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर
– सोसाट्याच्या वारा व विजेच्या कडकडाटासह तुफान
– विजेचे रोहीत्र सुध्दा भुईसपाट
लोकशस्त्र न्युज नेटवर्क: मारेगाव
कोसारा येथे ता. ३० मार्च ला रात्री ७.२० वाजेदरम्यान बेंधुंद झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने व पावसाने अक्षरशः झोडपुन काढत अनेक घरावरील छप्पर उडाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आल्याची माहीती असुन विजेचे रोहीत्र सुध्दा भुईसपाट झाल्यामुळे विद्युत पुरवठा सुध्दा खंडीत झाल्याची माहीती आहे.
आज सकाळपासूनच वातावरण बदलल्याचे दिसत असतानाच तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या कोसारा येथे अवकाळीचा प्रचंड प्रमाणात फटका बसल्याची माहीती आहे. दरम्यान आज ता. ३० मार्च रोजी सायंकाळी शेतीचे काम आटोपून शेतकरी शेतमजुर घरी परतले. मात्र ७.२० वाजेदरम्यान अकस्मात वादळी वाऱ्याचा रुद्रावतार त्यातच अवकाळी पावसाचा कोसारावासीयांना बसला असून यात अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडुन गेली त्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आले असल्याची माहीती आहे.
या ४०,५० मिनिटात होत्याचे नव्हते झाले. अनेक विद्युत खांब वाकले तर रोहीत्र भुईसपाट झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. टीनपत्रे कुठल्याकुठे उडुन गेली. तर मोठमोठी वृक्ष उन्मळून पडली असुन प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याची उपसरपंच सचिन पचारे यांनी लोकशस्त्र ला माहीती दिली असुन कुठलीही जीवीत हानी नाही ही दिलासादायक बाब असल्याचे सांगत प्रशासनाला सुध्दा कळविण्यात आल्याचे उपसरपंच सचिन पचारे यांनी सांगीतले.