
– नागरिकांनी सहभागी होण्याचे ठाणेदारांचे आवाहन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
गुन्ह्यातील जप्त व बेवारस पडून असलेल्या ७ वाहनांचा शासकीय नियमानुसार लिलाव १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक मारेगाव पोलीस ठाण्यात होणार आहे.यात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्दन खंडेराव यांनी केले आहे.
मारेगाव पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या गुन्ह्यातील व अपघातातील ७ वाहने जप्त आहेत. या वाहनांवर अजून पावेतो कोणीही मालकी हक्क सिद्ध केला नसल्याने ही वाहने पोलीस ठाण्यात बेवारस स्थितीत असून या वाहनांचा लिलाव होणार आहे.
मारेगाव येथील पोलीस ठाण्यात १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता गुन्ह्यातील जप्त व बेवारस ७ वाहनांचा शासकीय नियमानुसार लिलाव होणार आहे.यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्दन खंडेराव यांनी केले आहे.