
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क मारेगाव
मारेगाव येथील शब्बीर अलाउद्दीन सय्यद यांच्या पत्नी व जनहित कल्याण संघटनेचे उपाध्यक्ष रॉयल सय्यद यांच्या आई अपसाना परवीन सय्यद (४५) यांचे २५ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजे दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले.
मनमिळावू व सुस्वभावी अपसाना सैय्यद (मुन्नी) यांना कॅन्सर असल्याची माहिती असून गेल्या दोन वर्षापासून त्या कॅन्सरशी दोन हात करीत होत्या.अशातच २५ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांनी मारेगाव येथील आपल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,एक विवाहित मुलगी असा आप्त परिवार असुन अपसाना यांचा दफनविधी आज दुपारी दोन वाजता मारेगाव येथील मुस्लिम कब्रस्तान मध्ये होणार आहे.