
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
समस्त प्रवर्गातील संघटीत व असंघटीत कला क्षेत्रातील कलावंत,वारकरी ह्यांचे कडून समाज प्रबोधनाचे दिशादर्शक कार्य अखंडीत सूरू राहावे, समाज मनात आपल्याआराध्य दैवतांचे,संत व राष्ट्रीय महापूरूषांच्या आध्यात्मिक नैतीक,व पूरोगामी विचारांचे सिंचन अव्याहत सूरू रहावे, कलावंत व वारकरी मंडळीची अस्मीता, मानसम्मान जपल्या जावा,शासनाच्या खांद्याला खांदा लावून शासनाच्या कल्याणकारी योजना गावखेड्यापर्यत पोहचवून गोरगरीबांना अधिकाधीक दिलासा मिळावा ह्या ऊदात्त हेतूने अ.भा.कलावंत न्याय हक्क समिती चे कलावंत पदाधिकारी व कार्यकर्ते समर्पित भावनेनी कार्य करीत आहे.
जिल्ह्यातील अतिदूर्गम गाव खेडे,वाडे,तांड्या पर्यंत तथा शहरी भागात आपल्या भजन गायनातून,किर्तनातून,प्रबोधनातून ,ऑर्केष्ट्रा , पथनाट्य ई.विवीध कला सादरीकरणातून कूटूंबाचा ऊदरनिर्वाहाचा गाडा चालविणा-या कलावंताच्या जगण्याचे प्रश्न ,मूलभूत गरजा व मागण्या शासनासमोर ताकदीने मांडून न्याय व दिलासा मिळवून देण्यासाठी व समस्त कलाप्रवर्गाचे हित जोपासण्यासाठी प्रचंड ताकदीने संघर्ष करीत आहे.
जिल्ह्यातील मारेगाव तालूका आदिवासी बहूल व विकास प्रवाहात ऊपेक्षीत असल्याने ह्या क्षेत्रातील कलावंत सूध्दा शासनाच्या योजनेच्या लाभापासून वंचीत आहेत,ह्या कलावंतांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत.
त्यासाठी कलावंतांच्या प्रश्नाची जाण ,आस्था आणि तळमळ असणारे तालूक्यात सर्वाना परिचीत असलेले राजू सिडाम ह्यांची तालूकाअध्यक्षपदावर नियूक्ती करून समितीचे राष्ट्रीय महासचीव ॲड.श्याम खंडारे,विदर्भ विभागाचे कार्याध्यक्ष सिध्दार्थ भवरे ह्याचे हस्ते नियूक्ती पत्र त्यांना देण्यात आले आहे. त्यांच्या नियूक्तीचे मा.मनोहररावजी शहारे विदर्भ प्रमूख,जिल्हा अध्यक्ष अविनाश बनसोड,वारकरी कलावंत आघाडीचे जिल्हा प्रमूख मारोतराव ठेंगणे,ऊपाध्यक्ष गूणवंत लडके,महासचीव रमेश वाघमारे,संघटक अशोकराव ऊम्रतकर तथा समस्त तालूका अध्यक्ष, महीला तालूका आघाडी प्रमूख ई नी अभिनंदन केले आहे.