
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव येथील अनुप महाकुलकर यांची ता. १२ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी तालूकाध्यक्ष अविनाश लांबट यांनी, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंकर लालसरे यांच्या उपस्थितीत भाजपा शहराध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
अनुप महाकुलकर मागील पाच वर्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष होते. पाच वर्षांतील त्यांच्या कार्याची दखल घेऊन ता. १२ ऑगस्ट रोजी, स्थानिक शेतकरी सुविधा केंद्रात घेण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या अधिवेशनात अनुप महाकुलकर यांना आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार तथा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष शंकर लालसरे यांच्या उपस्थितीत तालूकाध्यक्ष अविनाश लांबट यांनी नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. पुढील सात दिवसांत अनुप यांनी शहर कार्यकारीनी तयार करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. भाजपा शहराध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यामुळे महाकुलकर यांचेवर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षांव होत आहे.