
♦जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत यवतमाळ येथे पार पडला सोहळा
♦लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मारेगाव तालुक्यातील उत्कृष्ठ अंगणवाडी केंद्र,उत्कृष्ठ पर्यवेक्षिका,जिल्ह्यातील उत्कृष्ठ पर्यवेक्षिका यांचा सत्कार सोहळा जिल्हा परिषद सभागृह,यवतमाळ येथे उत्साहात पार पडला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील उत्कृष्ट अंगणवाडी सेविकांचा गौरव सोहळा यवतमाळ येथील जिल्हा परिषद सभागृहात पार पडला.यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय मारेगाव अंतर्गत कार्यरत अंगणवाडी पर्यवेक्षिका पदमा कन्नाके यांना त्यांच्या उत्कृष्ठ कामगिरी करीता जिल्हास्तरावरील तृतीय पुरस्काराने मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
तालुक्यातील उत्कृष्ठ अंगणवाडी केंद्र म्हणून प्रथम पुरस्कार अंगणवाडी केंद्र कोसारा येथील शोभा मधुकर सातपुते,द्वीतीय पुरस्कार अंगणवाडी केंद्र कुंभा क्र. ३ येथील प्रतिभा शंकरराव नागभीडकर यांना मानचिन्ह देवून गौरविण्यात आले तर तृतीय पुरस्कार अंगणवाडी केंद्र वेगाव क्र.३ येथील कल्पना काकडे यांना मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
या वेळी ज्योती भोंडे मुख्य वित्त तथा लेखा अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ,प्रशांत थोरात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य )जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या हस्ते उत्कृष्ट सेवा केलेल्या अंगणवाडी सेविकांना मानचिन्ह देवून त्यांचा गौरव करण्यात आला.