
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
कोसारा येथील अंगणवाडी केंद्राला तेथील पालकांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून एक आलमारी सप्रेम भेट देऊन एक नवीन व आगळावेगळा पायंडा घालून दिल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अंगणवाडी केंद्राला ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुविधा पुरविण्यात येत असल्या तरी कोसारा येथील पालक व अंगणवाडीमध्ये संस्कार, वस्तु ओळख, प्राणी ओळख, खेळ शिकणाऱ्या चिमुकल्यांनी अंगणवाडीतील महत्वाचे पेपर व इतर महत्वाचे कागदपत्र सुरक्षित राहण्याचा दृष्टिकोन लक्षात घेऊन कु. मितांशी मिथुन चव्हान, रियांशी सुमित पचारे, संस्कृती देवानंद कन्नाके सुविद्या संदीप बेताल, नोविका प्रशांत खडसे,ओजस्वी शुभम झोटिंग यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन एक आलमारी कोसारा अंगणवाडी केंद्रास सप्रेम भेट देऊन एक नवीन पायंडा घालुन देत एक संदेश सुध्दा दिला असे म्हणने वावगे ठरु नये.
या कार्यक्रमास पालक चिमुकले व अंगणवाडी सेविका सह नागरीक उपस्थित होते.