
– पहापळ शाळा व्य.स.अध्यक्ष,सदस्य यांचे निवेदन सादर
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
येथील गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडूरवार यांचेवर टेबल-खुर्ची वादावरून करण्यात आलेले आरोप निरर्थक आहे.परिणामी गटशिक्षणाधिकारी प.स.मारेगाव येथील प्रभार त्यांचेकडेच ठेवण्यात यावा अशा आशयाचे निवेदन समस्त शाळा व्यवस्थापन समिती पहापळ अध्यक्ष, सदस्य व तथा ग्रा.प.सदस्य यांनी गटविकास अधिकाऱ्यांना ४ जुलै रोजी सादर केले.
मारेगाव प.स.येथील गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडूरवार यांनी प्रभार स्वीकारला त्यावेळी पासून येथील शिक्षण विभागाने कात टाकली असुन शाळांच्या शैक्षणिक कामांत कमालीची प्रगती झाली आहे.
तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव असो अथवा कब-बुलबुल मेळावा यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.आमचा त्यांचेशी वेळोवेळी संपर्क येतो.परंतु बिईओ यांचे कडुन कधीही कुठल्याही कर्मचाऱ्यास द्वेषपूर्ण वागणूक दिली गेली असे आमचे निदर्शनास आले नाही.
परिणामी बिईओ यांचेवर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असुन कुठलेही काम सर्वांना विश्वासात घेऊन करणारे गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडूरवार यांचे कडील प्रभार कायम ठेवण्यात यावा अशा आशयाचे निवेदन शाळा व्यवस्थापन समिती पहापळ अध्यक्ष, सदस्य व ग्रा.प.सदस्य यांनी गटविकास अधिकाऱ्यांना ४ जुलै रोजी सादर केले.
यावेळी अमोल गुरनुले यांचेसह भैय्या कनाके, संजय भुसारी, सोनाली भट, गोवर्धन तोडासे आदि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य व ग्रा.प.सदस्य उपस्थित होते.