
– रा.यु.काँ.चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पचारे यांचे निवेदन सादर
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मागील वर्षी खरीप हंगामातील पीक विम्याचे पैसे अजून पावेतो ए.आय.सी (एग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनी) ने शेतकऱ्यांच्या खात्यात वळते केले नसल्याने सदर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पचारे यांनी अन्न व औषध प्रशासन कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना दिले.
मागील वर्षी एआयसी कंपनीने यवतमाळ जिल्ह्यात ४ लाख शेतकऱ्यांचा विमा काढला होता. १८ जुलै २०२२ रोजी तालुक्यात महापूर झाल्याने प्रत्यक्षात ३ लाख ४९ हजार शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदविल्या होत्या.
एआयसी कंपनीने सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम द्यावयाची असताना केवळ २० ते ३० टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली आहे.
एकट्या मारेगाव,वणी व झरी तालुक्यात ४७ हजार तक्रारी असून त्याकडे अन्न व औषध प्रशासन कॅबिनेट मंत्र्यांनी स्वतः जातीने लक्ष देवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष सचिन पचारे यांनी अन्न व औषध प्रशासन कॅबिनेट मंत्री धर्मराज बाबा आत्राम यांना दिले.