
– गाठी-भेटी सुरु…राजकीय हालचालींना वेग
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेच्या अशा समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकाचे बिगुल वाजले असुन निवडणूक २८ एप्रिल रोजी होणार असल्याने सहकार क्षेत्रातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. बाजार समित्या ताब्यात ठेवण्यासाठी सहकार नेत्यांचा कस लागणार असून यामध्ये यशस्वी कोणाला करायचे…? याचा फैसला मतदारांच्या हाती राहणार असुन बऱ्याच ‘प्रतिष्ठित पक्षांची प्रतिष्ठा’ पणाला लागली आहे.
निवडणूक कार्यक्रम
२७ मार्च पासून सुरु झालेल्या नामनिर्देशनाच्या शेवटच्या दिवशी ३ एप्रिलला मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागेच्या निवडणुकीत सहकारी संस्था मतदार संघात सर्वसाधारण गटात ४१, महिला राखीव ०७, इतर मागासवर्ग मतदार संघ ०७, अनुसूचित जमाती राखीव मतदार संघ ०४, तर ग्रामपंचायत मतदार संघात सर्वसाधारण १४, अनु. जाती-जमाती मतदार संघ ०७, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघ ०५, व्यापारी अडते मतदार संघ ०४, हमाल, मापारी व तोलारी मतदार संघ ०२ अशा एकूण ९१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
५ एप्रिलला अर्जांची छाननी केली जाणार असुन नामनिर्देशन पत्र ६ ते २० एप्रिल पर्यंत मागे घेता येणार आहे.उमेदवाराची अंतिम यादी २१ एप्रिल ला चिन्हासह प्रकाशित केली जाणार असून ३० एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
राजकीय हालचालींना वेग
एपीएमसी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.त्यामुळे गाठी-भेटी सुरु झाल्या असुन राजकीय पक्ष कामाला लागले आहे. सहकार क्षेत्रातील निवडणूक ही कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर होत नसली तरी आपल्या पक्षाचे वर्चस्व स्थापित व्हावे यासाठी सर्व राजकीय पक्ष जय्यत तयारीला लागले आहे.