
– लाखोंचे नुकसान प्राथमिक असल्याचा कयास
– तालुक्यातील वेगाव येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील वेगाव येथे घराशेजारी असलेल्या गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्य,दुचाकी तसेच गोठ्यातील पशुधन गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १२ वाजेदरम्यान उघडकीस आली. यात शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक कयास आहे.
तालुक्यातील वेगाव येथील उमेश लक्ष्मण कापसे यांचे घराशेजारीच गोठा आहे. सदर गोठ्यात शेती उपयोगी साहित्या व्यतिरिक्त,पशुधन,सोफा तसेच त्यांच्या मालकीची दुचाकी व अन्य काही साहित्य ठेवले होते.
दरम्यान शुक्रवारी रात्री १२ वाजेदरम्यान गोठ्यात अचानक आग लागली. यावेळी गोठ्यातील शेती उपयोगी साहित्य तसेच त्यांची दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.यावेळी २ वर्षाचे गाईचे वासरु आगीच्या चटक्यामुळे अर्धवट भाजले गेले.तूर्तास नुकसानीची आकडेवारी निश्चित नसली तरी उमेश कापसे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक कयास आहे.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.