
— चोवीस दिवस मृत्युसी दिलेली झुंज ठरली अपयशी
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/मारेगाव
सलग चोवीस दिवस मृत्यूसी झुंज दिल्यानंतर लता मंगेशकर रुग्णालय नागपूर येथे कोसारा येथील ४३ वर्षीय माजी सरपंच रवींद्र वासुदेव खाडे यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला.
तालुक्याच्या अंतीम टोकावर वसलेल्या कोसारा येथील रवीद्र वासुदेव खाडे (४३) यांना समाजकारणासोबत राजकारणाची आवड असल्याने
सन २००७ मध्ये रवींद्र सरपंच होते. सरपंच पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळून नौकरीसाठी सुध्दा प्रयत्नरत असतानाच २०१३ मध्ये रवींद्र यांना शासकीय सेवा करण्याची संधी मिळाली तेव्हापासून ते शासकीय सेवेत कार्यरत होते.
मात्र मागील २४ दिवसापासून रवींद्र यांना जीबीएस नावाच्या आजाराने ग्रासले होते. रवींद्र यांना नागपूर येथील लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु सलग २४ दिवस मृत्युसी झुंज दिल्यानंतर आज ता. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता रवींद्र यांनी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व आप्तपरिवार आहे.
रवींद्र यांची अंत्ययात्रा आज ता.१६ सप्टेंबर रोजी दुपारी कोसारा येथील राहत्या घरुन निघणार असून दुपारी ३ वाजता हिंदू रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात येईल.