
– शहरासह परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यास प्रशासन सज्ज
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
आज पासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सव व होऊ घातलेल्या ईद ए मिलाद च्या पार्श्वभूमीवर मारेगाव शहरासह तालुक्यातील शांतता अबाधित असावी यासाठी शहराच्या मुख्य व अंतर्गत मार्गावरुन मारेगाव पोलिसांनी ता. १९ सप्टेंबर रोजी १२ वाजता ठाणेदार जनार्दन खंडेराव यांच्या नेतृत्वात पथ संचलन करीत आगामी सण तथा उत्सवासाठी मारेगाव पोलीस सज्ज असल्याचा प्रत्यय आला.
आगामी काळात अनेक सण उसत्व असुन शहरासह तालुक्यात गणेशोत्सव व इद ए मिलाद साजरी करण्यात येत आहे.
या कालावधीत कायदा, सुव्यवस्था अबाधित रहावी व सलोखा कायम असावा तथा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस स्टेशन पासुन महामार्गावरील मार्डी चौक, डाॅ.आंबेडकर चौक, अंतर्गत मार्गावरील गौसिया मस्जिद, जुनी वस्ती, नगरपंचायत, आदी मुख्यमार्गांवरून ता. १९ सप्टेंबर रोजी १२ वाजता ठाणेदार जनार्दन खंडेराव यांच्या नेतृत्वात तीन पोलीस अधिकारी १८ अंमलदार, व २० होमगार्ड यांनी शिस्तबद्ध पथसंचलन केले. यावेळी कर्मचारी यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले.