
– मारेगाव वरिष्ठ महाविद्यालयात ‘व्यसनमुक्ती’ वर मार्गदर्शन
– पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड व मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे यांच्या संकल्पनेचा परिपाक
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
‘नशा करी जीवनाची दुर्दशा’ या उक्तीला साजेशी अशीच आजच्या तरुण वर्गाची अवस्था झालेली आहे.आजचा युवा वर्ग कमालीचा नशेच्या आहारी गेला आहे.परिणामी तरुण वर्गाला नशेच्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, जिल्हा पोलीस दल व मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र,पुणे यांचे सोबतीने जिल्ह्यात ‘व्यसनमुक्त पहाट’ अभियान राबविण्यात येत आहे.त्या अनुषंगाने स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात ता .१७ ऑक्टोंबर रोजी व्यसनमुक्तीपर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सभागृहात उपस्थित सर्वांनीच व्यसनमुक्तीचा संकल्प केला.
आजची तरुण पिढी नशेच्या चक्रव्यूहात अडकली आहे . दुःखात ‘गम भुलाने को’ व सुखात ‘झिंगाट होऊन मदमस्त’ नाचण्यासाठी आजचा युवा हा नशेचा आधार घेतो.नशेचा अतिरेक झाल्याने युवा वर्गाकडून काही अकल्पित गुन्हे घडण्याच्या घटनाही जिल्ह्यात पुर्णत्वास गेल्या आहेत.
परिणामी तरुण वर्गास नशेचे दुष्परिणाम ज्ञात व्हावे व तरुणांनी जीवनाचा नाश नशेला कायमचे दूर करावे या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांचे कडून पुण्यातील मुक्तांगण नशा मुक्ती केंद्र यांचे सोबतीने जिल्ह्यात ‘नशा मुक्त पहाट’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत तरुणांना नशेचा वर्तुळ भेदून व्यसनमुक्त होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या अनुषंगाने मारेगावातील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सभागृहात ता.१७ ऑक्टोबर रोजी ‘नशा मुक्त पहाट’ कार्यक्रमांतर्गत नशा मुक्तीपर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे,प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे येथील अमीर देसाई तर प्रमुख अतिथी म्हणून मारेगाव पोलीस स्टेशन येथील ठाणेदार जनार्दन खंडेराव, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. हेमंत चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश घरडे यांनी विद्यार्थ्यांना नशेचे चक्रव्यूह कायमचे भेदण्याचे आवाहन केले.कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. हेमंत चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांच्या संकल्पनेतून मुक्तांगण नशा मुक्ती केंद्र पुणे यांचे सोबतीने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांच्या मार्गदर्शनातून घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी व राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.