
– राज्य महामार्गावरील जळका येथील अपघात
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील जळका नजीक एका उभ्या ट्रकला दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाल्याची घटना १५ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजेदरम्यान घडली.
रवी नामदेव जुनगरी (२२) रा.बोटोनी असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
दरम्यान १५ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजेदरम्यान रवी काही कामानिमित्त करंजी येथे जात होते.वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील जळका नजीक एका उभ्या ट्रकला त्यांच्या दुचाकीने जबर धडक दिली.यात रवी गंभीर जखमी झाले.
रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी रवी यांना प्रथम करंजी येथील रुग्णालयात दाखल केले. तूर्तास प्रकृती गंभीर असल्याने रवी यांना पांढरकवडा येथील रुग्णालयातून यवतमाळ येथील रुग्णालयात हलविल्याची माहिती आहे.