
– मारेगाव शहरातील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील व शहरातीलच शेतकरी सुविधा केंद्र समोर एका भरधाव दुचाकीने पादचारी इसमास धडक दिल्याने इसम गंभीर जखमी झाल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजे दरम्यान घडली.
पुंडलिक सालवटकर (५०) रा. मारेगाव असे अपघातात पायाला इजा होऊन गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.तर दुचाकी स्वार युवक गोधनी येथील असल्याची माहिती आहे.
दरम्यान २२ नोव्हेंबर रोजी पुंडलिक हे रस्त्यावरून पायदळ जात होते.यावेळी करणवाडी कडुन येणाऱ्या एका भरधाव दुचाकीने पुंडलिक यांना जबर धडक दिली. या धडकेत पुंडलिक यांच्या पायाला गंभीर इजा होऊन ते जमिनीवर कोसळले. यावेळी त्यांचा पाय मोडल्याचे काही प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले.
अपघाताची माहिती प्राप्त होताच त्यांच्या घराशेजारीलच काही लोकांनी जखमी पुंडलिक यांना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून वृत्त लिहीपर्यंत पुढील माहिती प्राप्त होऊ शकली नाही.