
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/ मारेगाव…..
वणी यवतमाळ राज्यमार्गावरील सोमनाळा फाट्यानजीक दुचाकीचा अपघात झाल्याची घटना ता. १८ मार्च रोजी रात्री सात वाजेदरम्यान घडली असून अपघातात एक इसम गंभीर जखमी तर एक किरकोळ जखमी आहे.
वणी यवतमाळ राज्यमार्गावर ता. १८ मार्च रोजी रात्री सात वाजेदरम्यान सालेभट्टी येथील शेखर आत्राम व बोटोणी येथील अशोक पिदुरकर हे वणीवरुन दुचाकीने मारेगांव कडे येतांना सोमनाळा फाट्यानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीचा अपघात होऊन दोघेही दुचाकी वरुन पडले. त्यात सालेभट्टी येथील शेखर यांच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली.
जनहित कल्याण संघटनेचे मारेगांव तालूका उपाध्यक्ष राॅयल सय्यद व कपिल कुडमथे यांना अपघाताची माहीती मिळताच, रुग्णवाहीकेसह अपघात स्थळी पोहचत अपघातग्रस्त दोघानाही तत्काळ मारेगांव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वृत्त लिहिस्तोवर मारेगांव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र यातील सालेभट्टी येथील शेखर यांना इतरत्र हलविण्याची प्रक्रीया सुरु होती.