
– मारेगाव शहरातील घटना
– दुचाकीस्वार हिंगणघाट येथील
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
स्थानिक कला वाणिज्य महाविद्यालया समोर भरधाव दुचाकी वरील नियंत्रण सुटून दुचाकीची दुभाजकाला धडक बसल्याने दुचाकीस्वार दोन व्यक्ती जखमी झाल्याची घटना ७ ऑगस्ट रोजी रात्री ७:३० वाजे दरम्यान घडली.
अभिजित मिलींद दारूंडे (२९) व अनिकेत सत्यपाल रामटेके (२८) दोघेही रा.हिंगणघाट अशी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
दरम्यान सोमवारी रात्री ७:३० वाजेदरम्यान दोघेही आपल्या दुचाकीने हिंगणघाट येथे जात असता स्थानिक कला वाणिज्य महाविद्यालयासमोर भरधाव दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकाला धडकली.यात दुचाकीवरील दोन्ही व्यक्ती जखमी झाले.
रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी जखमींना प्राथमिक उपचाराकरिता मारेगाव येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता दोन्ही जखमींना पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविल्याची माहिती आहे.