
– राज्य महामार्गावरील खडकी फाट्यावरील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील खडकी फाट्या नजिक भरधाव कार पलटी झाल्याने कार मधील एक जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६:३० वाजे दरम्यान घडली.जखमीला वणी येथील सुगम हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आल्याची माहिती आहे.
सदर कार ही सतीश खाडे रा.वणी यांचे मालकीची असल्याची माहिती असुन सतीष आपल्या कुटुंबासह केळापूर येथून जगदंबा मातेचे दर्शन घेऊन परत येत होते.
दरम्यान वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील खडकी फाट्यानजीक त्यांची भरधाव कार पलटी झाली.यात कारमध्ये असलेल्या त्याच्या मातोश्री किरकोळ जखमी झाल्या.कार मधील ईतर तीन व्यक्ती सुखरूप असल्याची माहिती आहे.
तुर्तास सतीष यांच्या मातोश्रीस वणी येथील सुगम हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.