
— जप्तीची केली कार्यवाही
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वनविभागाचे अधिकारी तथा कर्मचारी केगांव शिवारात ता. १ मे रोजी सामुहिक गस्तीवर असताना अवैध रेती तस्करी व वाहतुक करताना सकाळी ९ वाजे दरम्यान एक ट्रॅक्टर पाठलाग करत पकडला असुन जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
तालुक्यात वनविभागाच्या हद्दीत रेतीचे भरपुर प्रमाणात साठे असून रेती तस्कर या रेतीवर नजर ठेवून आहे. सध्या रेती तस्करीचे प्रमाण खुपच असल्याने वनविभागाने सुध्दा जंगल क्षेत्रात गस्त वाढविली आहे.
दरम्यान मारेगांव वर्तुळातील नियतक्षेत्र केगांव अंतर्गत कक्ष क्र.सी ५५ बी मध्ये सामुहिक रित्या गस्त करित असतांना जंगल क्षेत्रातुन वाहणाऱ्या निर्गुळा नदीपात्रातून अवैद्य रित्या जंगल मार्गाने रेती तस्करी व वाहतुक होत असल्याचा जंगल क्षेत्रात पथकासोबत कर्तव्यावर असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर व सहकाऱ्यांना संशय आला. त्यामुळे नदी तीराने गस्ती घालण्यास सुरुवात केली. दरम्यान एक टॅक्टर निर्गुळा नदी पात्रातील रेती जंगल मार्गाने वाहतुक करित असल्याचे निर्दशनास आले. वनविभागाचे पथक दिसताच टॅक्टर वाहकाने धुम ठोकत व पळ काढला. परंतु वन विभागाचे वाहन चालक रमेश अंबरवार व पप्पु यांनी ट्रॅक्टरचा यशस्वी पाठलाग करत वेगांव गांवामध्ये पकडुन त्यावर भारतीय वन अधिनीयम १९२७ अंर्तगत कार्यवाही केली. सदर ट्रॅक्टर मालकाचे नाव सुहास हरी हिंगाणे असुन ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३४ एपी २५८८ आहे. सदर कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.) मारेगांव शं. ग. हटकर, क्षेत्रसहाय्यक मारेगांव, डी. एन. पोयाम, क्षेत्रसहाय्यक वडकी एम. यु. टोंगे व वनरक्षक केगाव बिट कु. मृणाली मडावी यांनी ता. १ मे रोजी सकाळी ९ वाजता केली.
मानव व वन्यजीव संघर्ष घडेल असे कृत्य करु नये..!
मारेगांव वनरिक्षेत्रातील नागरीकांना आवाहन करण्यात येते कि, जंगल क्षेत्रामध्ये विना परवाना कोणीही प्रवेश करु नये. जंगल क्षेत्रातील झांडांची तोड करु नये, जंगल क्षेत्रामध्ये आग लावु नये, तसेच तेंदु पाने, मोह फुले वेचण्याकरिता एकटे जंगल क्षेत्रामध्ये जावु नये. एकंदरीत मानव वन्यजीव संघर्ष घडेल असे कुठलेही कृत्य करु नये.
शं. ग. हटकर
वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.)
मारेगांव.