
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/ मारेगाव…..
कुंभा येथील २६ वर्षीय विवाहित युवकाने ता.२४ जानेवारीला विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी ४ वाजेदरम्यान उघडकीस आली.
अभीकाश ऊर्फ आकाश नथ्थुजी आस्वले (२६) हा विवाहित युवक वडीलासोबत कुंभा येथे वास्तव्यास होता. मृतक ता.२४ जानेवारीला वडीलासोबत दवाखान्यात गेला असल्याची माहीती आहे. दवाखान्यातून दुपारी परत आल्यानंतर आकाश शेताकडे गेला. त्यानंतर त्याचा मोठा भाऊ सुद्धा शेतात गेला. आकाश दिसत नसल्याने त्याचा शोध घेतला असता कुंभा शेत शिवारातील नथ्थुजी झाडे यांचे विहरीत अभीकाश ऊर्फ आकाश नथ्थुजी आस्वले मृतावस्थेत आढळून आला.
अगदी तरुण वयात आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोळंखे यांचे मार्गदर्शनात स.फौ. दत्तु किनाके, नापोका राजू टेकाम करीत आहे.