
— मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील पहापळ येथील एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने शेतशिवारात विषारी कीटकनाशक प्राशन करून जीवन संपविल्याची घटना ता.४ जूलै रोजी उघडकीस आली.
माधव केशव खोके (५५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असुन कुटुंबासह पहापळ येथे वास्तव्यास होते. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असुन, त्यांचे नावे २.६० हेक्टर शेती आहे. यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. मागील पाच सहा वर्षांपासून शेती उत्पादनात घट आल्याने कर्ज असल्याची माहीती आहे.
दरम्यान ता. ३ जुलै रोजी रात्री ८.३० वाजेदरम्यान मृतक शेतातील गोठ्यात बैल व कोबड्या असल्याने जागल करण्यासाठी जातो असे सांगून शेतात गेले होते. शेतात विषारी कीटकनाशक प्राशन केले. ता. ४ जूलै रोजी सकाळी कुटुंबातील सदस्य शेतात गेले असता त्यांचा मृतदेह आढळून आल्याने त्यांनी घटनेची माहिती मारेगाव पोलीस स्टेशनला दिली. मृतकाचे पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनात जमादार आनंद अलचेवार करीत आहे.