
— संजय खाडे यांचा पुढाकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/मारेगाव
दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचा लोककल्यानाचा वसा तेवत रहावा व जनताजनार्दनाची सेवा घडावी हा उदात्त हेतू उरासी बाळगून काँग्रेस जिल्हा सरचिटणीस, तथा कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे व काँग्रेस सहकाऱ्यांच्या पुढाकाराने उद्या ता.४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता “चालतं फिरतं जनहीत केंद्र” चा भव्य शुभारंभाचे आयोजन करण्यात आले असुन या शुभारंभ प्रसंगी हजारोच्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वणी विधान सभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेच्या अनेक समस्या असुन या केंद्राच्या माध्यमातून शेतकरी, मजुर, महिला, युवा व दिव्यांग यांचे हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेचे जीवनमान सुलभ आणि सुकर करण्याचा प्रामाणिक हेतू उरासी बाळगून तथा दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचा लोक कल्याणकारी कार्याचा वसा सदैव तेवत रहावा, व लोक सेवा घडावी ही प्रेरणा घेत, चालतं फिरतं जनहित केंद्राची संकल्पना संजय खाडे यांनी वास्तवात आणत,दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या मोहिमेच्या शुभारंभाचे आयोजन उद्या ता. ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता, खाती चौक विराणी टॉकीज रोड वणी येथे करण्यात येणार असुन या शुभारंभ प्रसंगी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तथा वणी विधान सभा क्षेत्रातील जनता जनार्दनांनी हजारोच्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेसचे यवतमाळ जिल्हा सरचिटणीस, तथा कापूस पणन महासंघ संचालक संजय खाडे यांनी केले आहे.