
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील नवरगांव येथे एका ३६ वर्षीय युवकाने बैलांच्या गोठ्यात नायलाॅन दोराच्या सहाय्याने गळाफास घेवुन आत्महत्या केली.सदर घटना ता. २९ एप्रिल रोज सोमवाला दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
प्रफुल्ल उर्फ उमेश अशोक नक्षणे (३६) मृतकाचे नाव असुन ते कुटुंबासह नवरगाव येथे वास्तव्यास होते. त्यांची सामाईक क्षेत्रात अंदाजे ६ एकर शेती असल्याची माहिती असुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ता. २९ एप्रिल ला दुपारी २ वाजेदरम्यान बैलाच्या गोठ्यात नायलाॅन दोराने प्रफुल्ल उर्फ उमेश यांनी गळफास घेतल्याचे उघडकीस आले. आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय त्यांनी का घेतला हे मात्र वृत्त लिहीपर्यंत कळु शकले नाही.
मृतकाच्या पश्चात आई, अपंगावस्थेत थोरले बंधु, पत्नी, एक मुलगा व मुलगी आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किसन सुंकरवार करीत आहेत.