
– तालुका मुख्याध्यापक संघाचा पुढाकार
– स्थानिक राष्ट्रीय विद्यालयात आयोजन
– दिवंगत मुख्याध्यापकांना श्रद्धांजली अर्पण करून सोहळ्याची सुरुवात
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
आपला कार्यकाळ पूर्ण करून सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन स्थानिक राष्ट्रीय विद्यालयात २१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.मारेगाव तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने सदर सत्कार सोहळ्यात दिवंगत मुख्याध्यापकांना श्रद्धांजली अर्पण करून सत्कार सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.नंतर सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांचा सत्कार सोहळा पार पडला.सरते शेवटी नवनियुक्त मुख्याध्यापकांचे स्वागत करण्यात आले.
ता.२१ ऑक्टोंबर रोजी आयोजित सत्कार सोहळ्यात सर्वप्रथम दिवंगत मुख्याध्यापकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यात स्व.मुख्याध्यापक अनिल बाबाराव ताजने (मुख्याध्यापक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय,मारेगाव),स्व. सुनील दि.चोपणे (मुख्याध्यापक बालाजी चोपणे विद्यालय, बोटोनी) स्व.मुख्याध्यापक खंगार( सद्गुरु जगन्नाथ महाराज विद्यालय, वेगाव) यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर तालुक्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार सोहळा पार पडला.यात मारेगाव राष्ट्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश पोटे,दामोदर पंत कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुषमा काळे,सद्गुरू श्री. जगन्नाथ महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक चिकटे
यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला.
सरते शेवटी तालुक्यातील नवीन मुख्याध्यापक पद स्वीकारलेल्या मुख्याध्यापकांचा स्वागत समारंभ पार पडला.यात कै.दामोदर पंत कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र साळवे,महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय,मारेगावचे मुख्याध्यापक हेमंत अनिल ताजणे,बालाजी पंत चोपणे विद्यालय, बोटोनी येथील वासेकर,सद्गुरु श्री. जगन्नाथ महाराज विद्यालय वेगावचे वाघमारे,लक्ष्मीबाई मोघे विद्यालय जळका येथील नहाते आदी नवनियुक्त मुख्याध्यापकांचे स्वागत करण्यात आले.
सेवानिवृत्त सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विनोद संगीतराव तर प्रमुख अतिथी प्रकाश भुमकाळे,भुमन्ना बोमकटीवार,निरज डफळे, नागोराव चौधरी, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडुरवार आदी उपस्थित होते.
सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली जेनेकर यांनी तर आभार प्रदर्शन सुनील आष्टेकर यांनी केले.