
– ‘गोळाफेक’ मध्ये प्रथम : राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत अमरावती विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा ता.१८ ऑक्टोबर रोजी अकोला येथे थाटात पार पडल्या.यात ‘गोळाफेक’ या क्रीडा प्रकारात मारेगाव कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी फाजील आदिल जुमनाके याने प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेत कुच केली.परिणामी फाजील कौतुकास पात्र आहे.
मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका असल्याने इतर तालुक्यांच्या तुलनेत क्रीडा प्रकारात काहीसा मागासलेला असल्याचा सर्वसामान्यांचा समज आहे. परंतु गत काही महिन्यांपासून मारेगाव तालुका विविध क्रीडा प्रकारात कात टाकताना दिसतोय.
दरम्यान महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत अमरावती विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा ता.१८ ऑक्टोबर रोजी अकोला येथे थाटात पार पडल्या. या क्रीडा स्पर्धेत मारेगाव कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी फाजील आदिल जुमनाके याने ‘गोळाफेक’ या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला.
विभागीय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याने फाजील जुमनाके या विद्यार्थ्याची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेकरिता निवड झाली असून मध्यमवर्गीय कुटुंबातून असलेल्या फाजीलने यशाला घातलेली ही गवसणी कौतुकास पात्र आहे.
फाजील आदील जुमनाके या विद्यार्थ्याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य हेमत चौधरी तसेच आवारी मॅडम, प्रा. हेलगे, प्रा. चिंचोलकर यांचेसह प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिले आहे.
फाजीलने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जिवन पाटील कापसे व प्राचार्य हेमंत चौधरी यांनी फाजीलचे विशेष अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.