
– प्र.क्र.१२ येथील नागरिकांची न.प. व जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
शहरातील प्रभाग क्र. १२ येथे निर्माणाधिन अवस्थेत असलेल्या एका इमारतीत दारूभट्टी स्थलांतरित होत असल्याने या विरोधात प्रचंड जन आक्रोश उफाळला असून येथील नागरिकांनी ११ जुलै रोजी नगरपंचायत कार्यालयावर तर १२ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, उत्पादन शुल्क विभाग,यवतमाळ येथे धडक दिली.यावेळी निर्माणाधीन अवस्थेत असलेल्या इमारतीत दारूभट्टी स्थानांतरीत करु नये अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही सदर निवेदनातून देण्यात आला आहे.
शहरातील एका दारूभट्टीच्या स्थानांतरणास वेग आला आहे.मारेगावातील प्रभाग क्रमांक १२ येथील चुन्नी पटेल ले-आउट मध्ये एका निर्माणाधीन अवस्थेत असलेल्या इमारतीत ही दारूभट्टी स्थानांतरित करण्यात येणार असल्याची माहिती येथील नागरिकांना मिळाली.
प्रभाग क्रमांक १२ येथे बौद्ध धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘बुद्ध विहारा’ नजीकच ही निर्माणाधीन इमारत असल्याने या इमारतीत दारूभट्टी स्थानांतरित झाल्यास येथे तळीरामांची फौज वाढुन धार्मिक विटंबना,व्यसनाधीनता वाढून येथील शांतता भंग होण्याचा धोका नाकारता येत नाही.
परिणामी प्रभाग क्रमांक १२ येथील शेकडो नागरिकांनी ११ जुलै रोजी नगरपंचायत कार्यालयावर तर १२ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व उत्पादन शुल्क विभाग यवतमाळ येथे धडक देत दारू भट्टीचे स्थानांतरण बुद्ध विहारा नजीक असलेल्या चुन्नी भाई पटेल ले-आउट येथे करू नये अशा आशयाचे निवेदन दिले.सदर निवेदनाची दखल घेतली न गेल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी प्रभाग क्रमांक १२ येथील रहिवासी निलेश तेलंग यांचेसह सुदर्शन पाटील,लक्ष्मीकांत सोयाम, विनय डोहने, बबन पाटील, वैशाली डांगे,शामला खैरे, शिवम रायपुरे, रवी तेलंग,शितल तेलंग,प्रतिभा चौधरी,कविताताई ताकसांडे,पूजा तेलंग,रुपाली पाटील,नूतन तेलंग,मोनाली रायपुरे,सोनू पाटील,पूनम पुनवटकर,सुलताना कुरेशी,
जमीला शेख,सुनीता चिकाटे,सपना वनकर,अश्विनी खाडे,शाहिदा इरफान शेख,विद्या सोयाम,नुसरत शेख,गुलनाज पठाण तसेच प्रभाग क्रमांक बारा येथील शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.यात प्र.क्र.१२ येथील महिलांचा फौज फाटा मोठ्या प्रमाणात उपस्थित होता हे विशेष उल्लेखनीय.