
– मार्डी केगाव येथील शेतकऱ्यांचा उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदनातून सज्जड दम
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
महावितरणच्या कारभाराविरुद्ध तालुक्यातील मार्डी केगाव येथील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष उफाळला असून येथील शेतकऱ्यांनी १४ जुन रोजी विविध मागण्या संबंधीचे निवेदन उपकार्यकारी अभियंता म.रा.वी.वी. मारेगाव यांना देत पुढील पाच दिवसाचे आत मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचे हत्यार उपसू असा सज्जड दम निवेदनातून दिला आहे.
तालुक्यातील मार्डी केगाव (एजी) येथे विविध समस्या असून वीज वितरण कंपनीचे त्याकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक खच्चीकरण करण्यास वीज वितरण कंपनी जबाबदार आहे असा आरोप सदर निवेदनातून करण्यात आला आहे.
१४ जुन रोजी उपकार्यकारी अभियंता म.रा.वी.वी.मारेगाव यांना दिलेल्या निवेदनात मुख्यत्वे केगाव एजी वरील लोड रिलीफ मिळावा,केगांव एजी वरील लाईनस्टॉप मध्ये वाढ करावी, केगाव एजी वरील झाडे कटाई करावी, केगांव एजी वरील वाकलेले, झुकलेले सर्व पोल दुरूस्ती करून घ्यावेत,कैगांव एजी वरील सर्व डी.बी. स्ट्रक्चर ए.बि.स्विच लावुन घेण्यात यावी, केगाव एजी वरील सर्व वितरण बॉक्सची दुरूस्ती करण्यात यावी तसेच ग्रामीण शाखेचे प्रमुख फोन उचलत नसल्याने त्यांचेवर कारवाई करण्यात यावी ई. प्रमुख मागण्या सदर निवेदनातून करण्यात आल्या आहे.
निवेदनाची वेळीच दखल न घेतली गेल्यास उपोषणाचे हत्यार उपसू असा सज्जड दम निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी मार्डी केगाव येथील शेतकरी गजानन मत्ते,जयवंत देऊळकर, उदय खिरटकर आदी उपस्थित होते.