
– दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (२ जून ) दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे.
इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाल्याने आता दहावीचा निकाल कधी जाहीर होणार…? याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे डोळे लागले होते.
मात्र,आता निकालाची तारीख जाहीर झाली आहे.२ जूनला निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाईन प्रिंट आऊट काढता येणार आहे.
निकाल खालील लिंक वर पाहता येईल…
१. mahresult.nic.in
२. https://ssc.mahresults.org.in
३. http://sscresult.mkcl.org