
– जोरदार पावसासह वादळी वाऱ्याचा फटका
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्याने शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मारोबा मंदिरा नजीक भर रस्त्यावर बाभळीचे झाड उन्मळून पडले असून यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
दिवसा तापमानाचा पारा ४३ अंशावर गेला असताना काल रात्री वातावरणात अचानक बदल होत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने शहरासह परिसर झोडपून काढला.यावेळी परिसरात विजेचा लपंडाव सुरू होता.
दरम्यान वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील तसेच शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मारोबा मंदिरा शेजारी बाभळीचे झाड प्रचंड वाऱ्याचे तांडव सहन न झाल्याने उन्मळून पडले.सद्यस्थितीत राज्य महामार्गावर पडून असलेले हे झाड अपघातास निमंत्रण देत आहे.