
– मारेगाव तालुक्यातील घटना
– उपचारा दरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मुकटा येथील एका २९ वर्षीय युवकाने ता. २६ मे रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान विषारी द्रव प्राशन केले होते. मात्र चंद्रपूर येथील दवाखान्यात उपचारादरम्यान ता. २७ मे रोजी त्यांचा मृत्यु झाला आहे.
प्रफुल्ल उत्तम तुरणकार (२९) आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असुन तो पुणे येथे एका कंपनीत चांगल्या पगारावर कार्यरत होता. पंधरा वीस दिवसापुर्वी प्रफुल्ल हा आई बाबांना भेटण्याकरीता आला होता.
सुटी संपत आल्याने ता. २६ मे रोजी तो पुणे येथे जाणार असल्याने त्यांनी स्वतः ता.२६ मे चे सायंकाळी सात वाजता जाणाऱ्या ट्रॅव्हल चे आरक्षण सुध्दा केले होते. मुलगा पुणे ला जाणार म्हणून आई त्याच्यासाठी डबा तयार करण्यात व्यस्त होती. प्रफुल्ल च्या मनात काय चालले याची कुणालाही पुसट कल्पना नव्हती.
अचानक पाच वाजेदरम्यान प्रफुल्लला उलटी झाली.उलटी का झाली हे लक्षात येताच प्रफुल्लला तात्काळ वरोरा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु तब्येत जास्त असल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र ता. २७ मे रोजी सकाळी उपचारादरम्यान प्रफुल्ल यांनी अखेरचा श्वास घेतला. आत्महत्येचे कारण बातमी लिहिस्तोवर कळु शकले नाही.