
– मारेगाव तालुक्यातील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील बोटोणी येथील सराटी फाट्यानजीक रोड लगत उभ्या ट्रकला विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना २४ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान घडली. यात धडक देणारा ट्रक चालक जखमी झाला.
सतत उन्हाची काहीली सुरू असताना वाढत्या उन्हापासून बचाव व्हावा म्हणून ट्रक (एम.एच.४० सी.एम. ०५२५) हा रस्त्यालगत उभा करून ट्रकचालक सावलीत विसावा घेत असता मारेगाव कडुन विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका दुसऱ्या ट्रकने (एम.एच.३४ बी.जी.२७४६) उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली.यात चालक गौरव सिंह हा जखमी झाला.
दरम्यान ट्रक चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याने चालकाचे स्टेअरिंग वरील नियंत्रण सुटून ट्रक चक्क रस्त्या लगत असलेल्या वसंता खाडे यांचे शेतात शिरला.यात शेतातील कुंपणाचे सिमेंटचे पोल व तार तुटल्याने शेतकऱ्याचे अंदाजे दहा हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे.
जखमी ट्रक चालकास गावातील नागरिकांनी करंजी येथील टोल नाक्याच्या रुग्णवाहिकेने करंजी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता प्रथमोपचार करून ट्रक चालकास डिस्चार्ज मिळाल्याची माहिती आहे.