
– शहरात पावसाच्या सरी
– पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव सह परिसरात गेल्या काही दिवसापासून आकाश ढगांनी व्यापले असल्याने उन्हाचे चटके काहीसे कमी जाणवत असताना शहरात १४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेदरम्यान वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
गेले काही दिवसात वातावरणात कमालीचा बदल होऊन उन्हाची उघडझाप सुरू होती.यातच शुक्रवारी सायंकाळी ७ वाजे दरम्यान शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली.तब्बल दोन तास पावसाची रिमझिम सुरू असल्याने वातावरणात काहीसा गारठा निर्माण झाला होता.
अनपेक्षितपणे कोसळलेल्या पावसाने जनसामान्याची चांगलीच तारांबळ उडून शहरात काही वेळ विजेचा लपंडाव सुरू होता. पुढील दोन दिवस पावसाची संभाव्य शक्यता असल्याचा अंदाज असून नागरिकांनी विशेषतः शेतकरी बांधवांनी सजग राहुन शेतीच्या कामांचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे.