
-कुटुंबासमवेत मित्र परिवारावर शोककळा
•लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
झरी येथे तलाठी पदावर कार्यरत असलेले व पांढरकवडा येथे वास्तव्यास असलेले नवीन सुरपाम (४३) यांचे २० मार्च रोजी पहाटे उमरी येथील रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.नवीन चे वडील मारेगाव येथे वास्तव्यात असल्याने नवीन च्या बालपणासह शिक्षण मारेगाव येथे पुर्ण झाले असल्याने मारेगाव वासियांशी त्यांची विशेष नाळ जुळली होती.
मनमिळावू व गोड स्वभावाच्या नवीनच्या अशा जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून आज दुपारी पांढरकवडा येथील सार्वजनीक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.नविनच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुली असा आप्त परिवार आहे.