
– पालकमंत्र्यांकडुन ‘ग्रीन सिग्नल’
– विकास कामांना येणार गती
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
सद्यस्थितीत महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणाच्या प्रचंड उलट फेरात आघाडी सरकार नंतर शिंदे- फडणवीस सरकारने जम बसविला.परिणामी पालकमंत्री म्हणून संजय राठोड यांची वर्णी लागली.पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच संजय राठोड यांनी विकास कामांना प्रथम प्राधान्य देत मारेगाव शहराच्या सौंदर्यकरणास ८४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.या निधीमुळे विकास कामांना कमालीची गती येणार आहे.
तालुक्यासह शहरातील विकास कामांचा ढासळलेला आलेख पाहता शिवसेना तालुकाध्यक्ष (शिंदे गट) विशाल किन्हेकार यांनी सदर निधी करिता पालकमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केला होता. यास पालकमंत्र्यांनी ‘ग्रीन सिग्नल’ देत तब्बल ८४ लाख रुपयांचा निधी मारेगाव शहराच्या सौंदर्यकरणास मंजूर केला.
यात नागरी दलित सुधारणा योजनेअंतर्गत शहरातील स्मशानभूमीचे सौंदर्यकरणास २४ लाख ७५ हजार ९१५ रुपये, प्रभाग क्रमांक १ येथील धामणी रोड येथील सीडी वर्क करिता ३ लाख ५१ हजार ५८५ रुपये व प्रभाग क्रमांक १० येथील ड्रोन नालीकरिता १९ लाख २१ हजार ३३० रुपये, प्रभाग क्रमांक १६ येथील भूमिगत गटारा करिता ९ लाख ५८ हजार ३७१ रुपये, प्रभाग क्रमांक १० येथील सिमेंट रस्त्याचे बांधकामा करिता ९ लाख ९१ हजार १५९ रुपये, प्रभाग क्रमांक २ येथील सिमेंट रोड करिता ८ लाख ३९ हजार ७८० रुपये, प्रभाग क्रमांक ३ येथील भूमिगत गटार नाली करिता ६ लाख २० हजार २७२ रुपये,तर प्रभाग क्रमांक ७ मध्ये रस्त्याच्या दुतर्फा गट्टू काम करिता २ लाख ६७ हजार रुपयांचा निधी खर्च करण्याची परवानगी नगरपंचायतला देण्यात आली आहे.
तूर्तास मारेगाव शहराचे सौंदर्यीकरणाकरिता तब्बल ८४ लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्याने शहरातील विकास कामांना वेग येणार हे निश्चित.
मी केलेल्या पाठपुराव्यातून मार्च २०२३ मध्ये ‘जन सुविधेतून २६ लाख’ रुपयांचा निधी पं.स.ला वळता करण्यात आला आहे.तूर्तास ‘त्या’ निधीतील चार गावांच्या विकास कामांची सुरुवात व्हावयाची आहे.मारेगाव शहराच्या विकास कामांकरिता पालकमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा करणे सुरू होते व आहे.त्यात ८४ लाख रुपये शहराच्या सौंदर्यीकरणाकरिता मंजूर झाले. शहरासह तालुक्याचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आणखी जवळपास १ करोड रुपयांच्या विकास कामांचे प्रस्ताव पालकमंत्र्यांना पाठविले आहे.ते प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून विकास कामांना गती देणे हाच प्रयत्न सदोदित असणार आहे.
विशाल किन्हेकार,
शिवसेना तालुका प्रमुख (शिंदे गट), मारेगाव.