
— म्हैसदोडका येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/ मारेगाव…..
म्हैसदोडका येथील एका ६२ वर्षीय वृध्देने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ता.२५ मे रोजी दुपारी ३ वाजेदरम्यान उघडकीस आली.
तालुक्यातील म्हैसदोडका येथे वास्तव्यास असलेल्या
शोभा वासुदेव पारखी (६२) असे विहिरीत उडी घेवून आत्महत्या केलेल्या वृध्देचे नाव असुन आज ता.२५ मे रोजी गावापासुन काही अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीत त्यानी उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी ३ वाजेदरम्यान उघडकीस आली. मृतक शोभा यांच्या पश्चात पती, तीन मुले तीन स्नुषा, व नातवंड असा मोठा परिवार आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किसन सुंकरवार करीत आहेत.