
— गोरज येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
गोरज येथील एक ३५ वर्षीय महिला ता.३० ऑगस्ट रोजी शेतात काम करुन घरी परत येतांना, दुपारी ३.३० वाजेदरम्यान वाटेतच वीज अंगावर कोसळून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
वीज कोसळून जागीच मृत्यू झालेल्या ३५ वर्षीय महिलेचे नाव निर्मला किसन आत्राम असुन पती व दोन मुलांसह त्या तालुक्यातील गोरज येथे वास्तव्यास होत्या. पती व मृतक दोघेही मोलमजुरी व भाड्याने शेती करुन संसाराच गाडा हाकत होते.
दरम्यान ता ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजेदरम्यान ढगांचा गडगडाट व वीजाचा कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. मृतक शेतात निंदन करुन घरी परत येतांना वाटेतच मोहन काळे यांच्या शेतात, त्यांच्या अंगावर विज कोसळली व त्या जागीच ठार झाल्या. घटनेची माहीती पोलीस पाटील प्रमोद ताजणे यांनी मारेगाव पोलीसांना दिली. माहीती प्राप्त होताच जमादार भालचंद्र मांडवकर हे घटनास्थळी पोहचुन वृत्त लिहीपर्यंत घटना स्थळाचा पंचनामा करून मृतक महिलेस उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये हलविण्यात आले होते.