
— बोरी (गदाजी)येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/मारेगाव
मारेगाव तालुक्यातील बोरी (गदाजी)येथील एका ३३ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारला दुपारी १२वाजेदरम्यान उघडकीस आली.
बोरी (गदाजी) येथे वास्तव्यास असलेले प्रितम सुरेश सिडाम (३३)असे विहिरीत उडी घेवून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असुन मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करीत होते. मृतक, पत्नी, तीन अपत्य, आई, वडीलासह राहत होते.
दरम्यान ता.१७ ऑक्टोबर रोज गुरुवारला दुपारी १२ वाजेदरम्यान विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. मारेगाव पोलीसात माहीती दिल्यानंतर
प्रितम यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय मारेगांव येथे उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला असून, पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.